Pimpri-Chinchwad : आपत्कालीन परिस्थितीसाठी महापालिका प्रशासन सज्ज 'या' हेल्पलाइनवर काॅल करा..

आपत्ती व्यावस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली
pimpri
pimpri sakal

Pimpri-Chinchwad - पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. मुळा, पवना व इंद्रायणी नद्या वाहू लागल्या आहेत. आगामी काळात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी पाणी शिरणाऱ्या शहरातील ठिकाणांचा सर्वे करून महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

आपत्ती निवारण कक्ष, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापनासाठीचे स्वयंसेवक आदींसह सर्व क्षेत्रीय कार्यालयस्तरावर बैठकी घेऊन स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

pimpri
Mumbai Local : पुन्हा सिग्नल यंत्रणेत बिघाड; लोकल सेवा विस्कळीत

आपत्ती व्यावस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. महापालिकेच्या पातळीवरील आपत्कालीन कक्ष स्थापन असून अग्निशामक दलाकडे उपकरणे तयार आहेत. कम्युनिटीबेस डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत ८०० स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांचा ‘पीसीएमसी योद्धा या व्हॉटस्ॲप ग्रुपच्या माध्यमातून सर्व संपर्कात आहेत.

pimpri
Mumbai News : सीएसएमटीमधील हेरीटेज रेल्वे इंजीन्स लोणावळ्यात शिफ्ट होणार; कारण...

अशी केली तयारी

महापालिका विविध विभागांच्या सातत्याने बैठकी घेऊन समन्वय ठेवण्यास प्राधान्य

नागरिकांना मदतीसाठी तत्काळ संपर्क साधता येईल यासाठी आपत्तीनिवारण कक्ष स्थापन

आठही प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आपत्ती व्यवस्थापन पथक तयार

स्थापत्य विभागाकडून धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधितांना सूचना

पाणी तुंबणे, झाड अथवा घर कोसळणे, घरांमध्ये पाणी शिरणे यांसाठी हेल्पलाइन

आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षासह अग्निशामक यंत्रणा २४ तास कार्यरत

एनडीआरएफच्या जवानांशी संपर्क, क्षेत्रीय कार्यालयांना बॅरिकेटस्

शहराच्या विविध भागातील ८०० स्वयंसेवकांचा सहभाग

pimpri
Mumbai News : सीएसएमटीमधील हेरीटेज रेल्वे इंजीन्स लोणावळ्यात शिफ्ट होणार; कारण...

व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून त्वरित संपर्क यंत्रणा

महापालिका अधिकारी, आपत्ती निवारण कक्ष व स्वयंसेवकांचा ‘पीसीएमसी योद्धा’ व्हॉटसॲप ग्रुप

जिल्हा, महापालिका, महावितरण, हवामान, जलसंपदा, पोलिस अधिकाऱ्यांचा व्हॉटसॲप ग्रुप

अग्निशामक दलाकडून बोटी व अन्य उपकरणांची दुरुस्ती पूर्ण

क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती

pimpri
Mumbai : मुंबईत भाजपाचे वाढले बळ! ठाकरेंच्या शिवसेनेसमोर खडतर आव्हान

हेल्पलाइन

आपत्ती निवारण कक्ष - ६७३३३३३३

अग्निशामक केंद्र - १०१, ९९२२५०१४७५, ७६, ७७, ७८

संत तुकारामनगर केंद्र - ०२०-२७४२३३३३, २७४२२४०५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com