PCMC News : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास प्रकल्पांसाठी १,२४६ कोटी ५० लाखांचे कर्ज घेण्यास स्थायी समितीची मंजुरी

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Approves Rs 1,246.50 Crore Loan for Development Projects : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांसाठी एक हजार २४६ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज घेण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. पवना बंदिस्त जलवाहिनी, ड्रेनेज आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा समावेश असून मोशी रुग्णालय वगळण्यात आले आहे.
PCMC

PCMC

sakal

Updated on: 

पिंपरी : महापालिकेच्या विविध महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांसाठी एक हजार २४६ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने अखेर बुधवारी मान्यता दिली. मात्र, या प्रस्तावातून मोशी येथील रुग्णालयासाठी घेण्यात येणारे कर्ज वगळण्यात आले आहे. पवना बंदिस्त जलवाहिनी, ड्रेनेज मास्टर प्लॅन, सांडपाण्याचा पुनर्वापर, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन अशा प्रकल्पांसाठी महापालिका कर्ज उभारणार आहे.

स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेमार्फत शहरातील पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, सांडपाण्याचा पुनर्वापर, सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रकल्पांचा एकूण खर्च सुमारे पाच हजार २९७ कोटी रुपये आहे.

Loading content, please wait...