महापालिकेचे आवाहन; मूळ कर भरलेल्यांनाच शास्तीमाफीचा लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home

अवैध बांधकामावर आकारली जाणारी शास्ती (दंड) सरसकट अर्थात सर्व प्रकारच्या बांधकामांना माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

PCMC : महापालिकेचे आवाहन; मूळ कर भरलेल्यांनाच शास्तीमाफीचा लाभ

पिंपरी - अवैध बांधकामावर आकारली जाणारी शास्ती (दंड) सरसकट अर्थात सर्व प्रकारच्या बांधकामांना माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, मूळ कराचा भरणा केल्यानंतरच शास्तीमाफीचा लाभ मिळकतधारकांना मिळणार आहे. त्यासाठी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सर्व करसंकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका करआकारणी व करसंकलन विभागाने घेतला आहे. शिवाय, मूळ कराची रक्कम भरल्यानंतर त्वरित शास्तीमाफीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. ते डाउनलोड करण्यासाठी करसंकलन संगणक प्रणालीत महापालिकेने बदल केला आहे.

अवैध बांधकामांची शास्ती माफ झाल्याने नागरिकांनी आता स्वतःहून मूळ कराचा संपूर्ण भरणा ३१ मार्च अखेर करून सहकार्य करावे. यापुढे शहरात कुठलेही अवैध बांधकाम होणार नाही, यासाठी कडक धोरण अवलंबिले जाणार आहे. तीन मार्चनंतर होणाऱ्या बांधकामांना पूर्वीच्याच दराने शास्ती लागू राहणार आहे.

- शेखर सिंह, प्रशासक, महापालिका

महापालिकेचे आवाहन

  • मालमत्ताधारकांनी मूळ कर त्वरित भरून शास्तीमाफीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे

  • मूळ कर संपूर्ण भरणा केल्यानंतर लगेच शास्तीमाफी प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल

नोंद नसल्यास...

  • तीन मार्चपूर्वी नोंद केलेल्या सर्व अवैध बांधकामांना शास्तीमाफी, पण नियमित नाहीत

  • तीन मार्चपूर्वी अस्तित्वात असूनही नोंद नसलेल्या बांधकामांबाबत सरकारचे मार्गदर्शन घेणार

भरणासाठी...

  • करसंकलन कार्यालये ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू

  • नियमित वेळेनंतरही कार्यालये सुरू ठेवून कर भरणा स्वीकारणार

न भरल्यास...

  • मालमत्ता कर न भरणाऱ्यांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणार

  • थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची मोहीम तीव्र करणार

मिळकती -

  • एकूण - ५,९१,१५०

  • शास्ती माफ - ९७,६९९

  • निवासी - ८६,४६१

  • इतर - ११,२३८