महापालिका निवडणुकीसाठी नेत्यांचे बोल; कार्यकर्त्यांचे ढोल

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी शहर पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली.
PCMC
PCMCSakal

पिंपरी - भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शहर पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी बैठक (Meeting) घेतली. पालकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pwar) दर आठवड्याला आढावा बैठक घेत आहेत. राष्ट्रवादीच्याच महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी महिलांचा (Women) निर्धार मेळावा घेतला आहे. कॉंग्रेसने कार्यकर्त्यांच्या बैठकी व आंदोलने सुरू केली आहेत. शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. (Pimpri Chinchwad Municipal Election Politics)

ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीने आंदोलनासाठी पुढाकार घेतला आहे. निमित्त काहीही असले तरी, सर्वपक्षीय नेते महापालिकेचे सूतोवाच देत असून त्यांचेच शब्द प्रमाण मानून कार्यकर्तेही निवडणुकीचे ढोल वाजवू लागले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण तयार होत असल्याचे चित्र आहे.

PCMC
पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सोनवणे यांचे निधन

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे दोन दिवसांपूर्वी शहरात आल्या होत्या. त्यांनी कासारवाडीत शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यांचे वडील व माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकेकाळी शहर भाजपची वाटचाल सुरू होती. आता त्यांची जागा पंकजा मुंडे यांनी घ्यावी व पक्ष संघटनेला आणखी मजबुती द्यावी, असा सूर उमटू लागला आहे. पक्षाचे विद्यमान शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली घराघरांत पक्षाचे काम पोचविण्याचे काम सुरू आहे.

पालकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शहराकडे लक्ष्य दिले आहे. कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत ते दर आठवड्याला पुण्यात आढावा बैठक घेत आहेत. त्यानिमित्त पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होत आहेत. त्यामाध्यमातून महापालिकेची सत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठीची व्यूव्हरचना केली जात असल्याची चर्चा आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दोन दिवसांपूर्वी आकुर्डीत महिला पदाधिकाऱ्यांना निर्धार मेळावा घेऊन नवीन नियुक्त्या केल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी पक्षाचे युवा नेते पार्थ पवार महापालिकेत येऊन गेले होते.

PCMC
पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत शाळा अद्यापही सुरूच

शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी चार महिन्यांपूर्वी पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, पक्षाने अद्याप तो स्वीकारलेला नाही. त्यामुळे महापालिकेची आगामी निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्ष लढविणार की, ऐनवेळी नवीन अध्यक्ष मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे. यापूर्वी सलग पंधरा वर्ष महापालिकेत त्यांची एकहाती सत्ता होती. आता त्यांचा एकही नगरसेवक नाही. पुन्हा महापालिकेत अस्तित्व दाखवायचे असा चंग त्यांनी बांधला आहे. सध्या साठे यांच्या नेतृत्वाखालीच कार्यकर्त्यांच्या बैठकी व आंदोलने सुरू आहेत. इंधन दरवाढी विरोधात व राष्ट्रीय प्रश्‍नांबाबत ‍त्यांनी आंदोलन केले असून केवळ भाजपच लक्ष्य असल्याचे दिसते आहे.

शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची आकुर्डीत बैठक होऊन नवनियुक्त्या झाल्या आहेत. पक्षाचा खासदार हेही त्यांचे बलस्थान आहे. ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला आहे. सर्व ओबीसी संघटनांनाबरोबर घेऊन गुरुवारी (ता. २४) ते आंदोलन करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com