esakal | Pimpri: कुत्र्यांमुळे अपघात; तरुणीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणीचा मृत्यू

पिंपरीत कुत्र्यांमुळे अपघात; तरुणीचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सर्वत्र मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसागणिक वाढत आहे. या कुत्र्यांमुळे आजपर्यंत लहानथोरांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. भटकी कुत्र्यांची झुंड आडवी आल्याने दुचाकीवरून पडल्याने २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची नुकतीच घटना घडली. तिच्या अपघाती निधनाने अजमेरा - मासुळकर कॉलनीत शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया पाटील (रा. अजमेरा -मासुळकर कॉलनी, एन.सेक्टर )असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी आयटी कंपनीत शुक्रवारी (ता.१) रात्रपाळीला होती. जेवणाच्या सुट्टीमध्ये पहाटे पाच वाजेच्या सुमारास ती दुचाकीवरून वानवडी - फातिमानगर येथे जात होती. त्याचवेळी अचानकपणे मोकाट कुत्र्यांची झुंड गाडीसमोर आली. स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्नांत ती गाडीवरून खाली पडून गंभीर जखमी झाली. डोक्याला मार लागल्यामुळे ती जागीच बेशुद्ध झाली.

हेही वाचा: ‘आयडीएसएससी’ स्पर्धेत राज्याचा डंका

तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना कोमात गेली. मात्र, त्याचदिवशी (ता.१) तिचा मृत्यू झाला. तिच्यापश्चात आई, वडील, चार बहिणी असा परिवार आहे. ती हा कायमच दुचाकीवरून जातांना हेल्मेट वापरत होते; मात्र या अपघातावेळीच त्याच्याजवळ हेल्मेट नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. याशिवाय परिसरातील मोकाट कुत्र्यांचा प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

loading image
go to top