
PMC Municipal Elections
sakal
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना सोमवारी (ता. ६) जाहीर झाली. प्रारूप प्रभागरचनेवर ३१८ हरकती व सूचना प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यापैकी प्रभागांच्या हद्दीबाबत केवळ दोन पूर्णतः मान्य, तर तीन अंशतः मान्य करण्यात आल्या आहेत, तसेच प्रभागांच्या व्याप्ती अर्थात वर्णनाबाबत (नाव) एक पूर्णतः, तर दोन अंशतः मान्य करण्यात आल्या. म्हणजेच ३२ पैकी २९ प्रभागांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.