पर्यावरणपूरक शहरासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका राबविणार 'हरित सेतू' 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

  • 'ग्रीन बेल्ट'मध्ये सायकलिंगसाठी मिळणार प्रोत्साहन 

पिंपरी : पर्यावरणपूरक शहरासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिका 'हरित सेतू' उपक्रम राबविणार आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य व सूचना कराव्यात, असे आवाहन महापौर उषा ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. या माध्यमातून महापालिकेच्या सर्व उद्यानांना तसेच शहरात असणाऱ्या हरित क्षेत्रांना पादचारी मार्ग (फुटपाथ) अथवा सायकल मार्गाने जोडले जाणार आहे. हा उपक्रम स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयुक्त हर्डीकर म्हणाले, "नागरिकांना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध व्हावे, तसेच पर्यावरणपूरक जीवनमान अधिक उंचावण्यासाठी हा उपक्रम पथदर्शी ठरणार आहे. या शहराला राहण्यासाठी अतिशय उत्तम शहर बनविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पर्यावरणपूरक साधनांचा प्रभावी वापर करून शहरभर विखुरलेल्या हरित क्षेत्रांना एकमेकांना जोडल्यास शहराची पर्यावरणीय गुणवत्ता वाढून त्याचा लाभ शहरवासीयांना होईल. शहर विकासात या उपक्रमाचे अनन्यसाधारण महत्त्व असणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील हरित पट्टे आणि विखुरलेल्या उद्यानांना जोडण्याचे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शहरातील सायकल मार्ग आणि पादचारी मार्गांचा वापर करून नागरिकांना सुरक्षितपणे एका उद्यानापासून इतर उद्यानांपर्यंत जाता येईल, अशाप्रकारे या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. या माध्यमातून शहराची पर्यावरणीय गुणवत्ता आणि चैतन्य वाढीस मदत होणार आहे. 

शहरामध्ये सद्यःस्थितीत विकसित केलेली उद्याने आहेत. तसेच भविष्यातील विकासात्मक दृष्टिकोनातून काही ठिकाणी हरित क्षेत्रासाठी अतिरिक्त जागांचे आरक्षण ठेवले आहे. भविष्यातील लोकसंख्या वाढ आणि बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा विचार केल्यास हरित सेतूचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. चारचाकी, इतर वाहनांचा वापर करून होणाऱ्या वाहतुकीऐवजी हरित सेतू हा एक उत्तम पर्याय मिळणार असून, हरित क्षेत्रातील नागरिकांचा प्रवेश सुखकर व सहज होण्यास मदत होणार आहे. 

- उषा ढोरे, महापौर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri-Chinchwad Municipal Corporation to implement 'Green Bridge' for eco-friendly city