

Pimpri Chinchwad Municipal Corporation Issues Notices to 10 Clerks
पिंपरी : महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कार्यालयीन वेळेत नेमून दिलेल्या जागेवर उपस्थित नसल्याचे भरारी पथकाच्या तपासणीत आढळून आल्याने दहा लिपिकांना प्रशासन विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या तपासणीत ही बाब निदर्शनास आली. संबंधित कर्मचाऱ्यांकडून सात दिवसांच्या आत खुलासा मागविण्यात आला आहे. मुख्य लिपिक सुनील शंकर चव्हाण, विशाल बाळासाहेब कांबळे, लिपिक स्वाती विलास गुल्हाने, मनीषा सुरेंद्र इंगवले, प्रगती राकेश कांबळे, राहुल दिलीप सकटे, संकेत विजयकुमार पेटकर, प्रियांका पांडुरंग कोंढाळकर, अनिकेत पवार आणि लखन डफळ यांना नोटीस बजावण्यात आली.