esakal | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समित्यांना मिळाले नवे पदाधिकारी 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समित्यांना मिळाले नवे पदाधिकारी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विषय समित्यांच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड आज मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समित्यांना मिळाले नवे पदाधिकारी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विषय समित्यांच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड आज मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. त्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या 25, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 15 आणि शिवसेनेच्या पाच, अशा 45 नगरसेवकांना संधी मिळाली. या विषय समित्यांमध्ये विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, कला-क्रीडा व सांस्कृतिक आणि शिक्षण या समित्यांचा समावेश आहे. प्रत्येक समितीवर नऊ नगरसेवकांची वर्णी लागली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशा समित्या असे सदस्य 

विधी समिती 

 • भाजप : स्वीनल म्हेत्रे, वसंत बोराटे, संगीता भोंडवे, सुजाता पालांडे, सीमा चौघुले.
 • राष्ट्रवादी कॉंग्रेस : अनुराधा गोफणे, सुलक्षणा धर-शीलवंत, पौर्णिमा सोनवणे.
 • शिवसेना : अमित गावडे

.महिला व बालकल्याण समिती 

 • भाजप : योगिता नागरगोजे, सविता खुळे, चंदा लोखंडे, माधवी राजापुरे, निर्मला गायकवाड.
 • राष्ट्रवादी कॉंग्रेस : गीता मंचरकर, निकिता कदम, मंगला कदम.
 • शिवसेना : अश्विनी चिंचवडे.

शहर सुधारणा समिती 

 • भाजप : साधना मळेकर, सोनाली गव्हाणे, अनुराधा गोफणे, सुनिता तापकीर, शारदा सोनवणे.
 • राष्ट्रवादी कॉंग्रेस : डॉ. वैशाली घोडेकर, संगीता ताम्हाणे, प्रज्ञा खानोलकर.
 • शिवसेना : सचीन भोसले.

कला-क्रीडा-सांस्कृतिक समिती 

 • भाजप : अश्विनी जाधव, केशव गोडवे, उत्तम केंदळे, शैलेश मोरे, बाळासाहेब ओव्हाळ.
 • राष्ट्रवादी कॉंग्रेस : डब्बू आसवांनी, प्रविण भालेकर, अपर्णा डोके.
 • शिवसेना : रेखा दर्शिले.

शिक्षण समिती 

 • भाजप : सारिका सस्ते, प्रियंका बारसे, मनिषा पवार, माया बारणे, तुषार कामठे.
 • राष्ट्रवादी कॉंग्रेस : मोरेश्वर भोंडवे, स्वाती काटे, भाऊसाहेब भोईर.
 • शिवसेना : अश्विनी वाघमारे

.मुदत संपल्यामुळे महापालिकेतील विषय समित्या 14 जून रोजी बरखास्त झाल्या होत्या. त्यावेळी लॉकडाउन व जमावबंदी आदेश लागू होता. त्यामुळे निवडणूक होऊ शकली नाही. आता प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून व व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाइन निवडणूक घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. त्यानुसार आज मंगळवारी (ता. 13) सर्वसाधारण सभेत विषय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेची स्थायी समिती म्हणजे शहराची तिजोरी आहे. विकास कामांबाबतचे सर्व निर्णय ही समिती घेत असते. या समितीचे अध्यक्ष व नवीन सदस्यांची निवड फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यामुळे ती कार्यरत आहे. मात्र, विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि कला-क्रीडा व सांस्कृतिक समित्यांची मुदत 14 जून रोजी संपली. त्या वेळी लॉकडाउन, संचारबंदी, जमावबंदी आदेश लागू असल्याने नवीन सदस्यांची निवड होऊ शकली. परिणामी, त्या बरखास्त झाल्या. त्यानंतर काही दिवसांतच शिक्षण समितीचीही मुदत संपल्याने तीही बरखास्त झाली होती. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्य सरकारच्या आदेशानुसार 14 जूनपासून विषय समित्यांचे अधिकार सर्वसाधारण सभेकडे होते. आता निवडणूक झाल्याने नवीन कारभारी मिळाले आहेत. ऑक्‍टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा आज मंगळवारी सुरू आहे. त्यात नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. यात सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांना संख्याबळानुसार संधी मिळाली. कोणत्या पक्षातून कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

सदस्य संख्याबळ 

महापालिकेतील प्रत्येक विषय समितीवर नऊ सदस्यांची निवड करण्यात आली. सभागृहातील संख्याबळानुसार नऊ सदस्यांमध्ये भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य निवडण्यात येणार होते. त्या-त्या पक्षाच्या सदस्यांची नावे संबंधित पक्षांच्या गटनेत्यांनी सर्वसाधारण सभेत महापौरांकडे सुपूर्द केले. त्यानंतर सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.