पिंपरी महापालिका निवडणुक : भवितव्याच्या भितीमुळे हरकती दाखल

पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या नव्या प्रभाग रचनेबाबत सोमवारपर्यंत (ता. १४) हरकती व सूचना मांडता येणार आहेत.
PCMC
PCMCSakal
Updated on
Summary

पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या नव्या प्रभाग रचनेबाबत सोमवारपर्यंत (ता. १४) हरकती व सूचना मांडता येणार आहेत.

पिंपरी - महापालिका निवडणुकीसाठी (Pimpri Chinchwad Municipal Election) जाहीर झालेल्या नव्या प्रभाग रचनेबाबत (Ward Structure) सोमवारपर्यंत (ता. १४) हरकती (Objections) व सूचना मांडता येणार आहेत. आतापर्यंत एक हजारांवर हरकती आल्या आहेत. सध्याच्या चार सदस्यीय प्रभाग रचनेऐवजी तीन सदस्यीय प्रभाग रचना झाल्यामुळे आपले ‘सेफ झोन’ (Safe Zone) फोडले गेले किंवा आपल्या भागाची विभागणी केली, नैसर्गिक हद्दी ओलांडल्या गेल्याने आपले हक्काचे मतदान गेले, या भावनेमुळे हरकती व सूचनांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी २०११ ची लोकसंख्या विचारात घेऊन प्रभाग रचना करावी. त्यासाठी २०१७ च्या निवडणुकीतील प्रगणक अर्थात ब्लॉक कायम ठेवून आणि नाले, नद्या, रस्ते, पुल, महामार्ग, लोहमार्ग अशा नैसर्गिक हद्दी विचारात घ्याव्यात, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशानाला केली होती. गुगल मॅपचा आधार घेऊन प्रभाग रचना करायची होती. त्यानुसार प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा प्रशासनाने निवडणूक आयोगाला पाठवला होता. ती प्रभाग रचना आयोगाने एक फेब्रुवारी रोजी जाहीर केली असून त्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत. त्या १६ तारखेला आयोगाला सादर केल्या जाणार असून त्यावर २६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यासाठी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची राज्य निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी यांच्या समक्ष अथवा आयुक्त नसल्यास उपायुक्त दर्जाच्या समकक्ष अधिकाऱ्याच्या उपस्थितीत सुनावणी होणार आहे. गुरुवारपर्यंत एक हजार ६७ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.

PCMC
मावळात बैलगाड्यांच्या पहिल्या बारीची.... भिर्रर्र झाली

नवीन प्रभाग रचना तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार केलेली आहे. त्यामुळे त्यांचे क्षेत्र सध्याच्या चार सदस्यीय प्रभाग रचनेपेक्षा कमी झाले आहे. शिवाय, नगरसदस्यांची संख्या १२८ ऐवजी १३९ होणार आहे. त्यामुळे ३२ ऐवजी ४६ प्रभाग झाले आहेत. त्यातील ४५ प्रभाग तीन सदस्यांचे आणि एक प्रभाग चार सदस्यांचा आहे. परिणामी सध्याच्या प्रभागांमध्ये बदल होणारच होते. मात्र, गेल्या पाच वर्षात विद्यमानांनी केलेली कामे, इच्छुकांनी केलेली तयारी व ‘अशा पद्धतीने होऊ शकतो प्रभाग’ या विचाराने केलेल्या अनेकांच्या तयारीवर पाणी फिरले आहे. तर, काहींचे क्षेत्र कमी झाल्याने नवीन रचना पथ्यावर पडणार असल्याने त्यांच्यात खुशीचे वातावरण आहे.

दृष्टिक्षेपात उदाहरणे

  • २०१७ च्या प्रभाग रचनेत तळवडेबाबत मोठा आक्षेप नोंदविला होता. कारण, तळवडेचा भाग असलेले त्रिवेणीनगर, रुपीनगर वगळले होते. हरकतीनंतर ते तळवडे गावठाणाला जोडून प्रभाग १२ अस्तित्वात आला होता. आता हा भाग प्रभाग एक झाला आहे.

  • सध्याच्या प्रभाग तीनची दोन भागात विभागणी झाली आहे. मोशी व डुडुळगाव मिळून स्वतंत्र आणि चऱ्होली व वाड्या वस्त्यांमिळून स्वतंत्र प्रभाग झाला आहे. त्यामुळे सध्याच्या चारऐवजी सहा नगरसेवक या भागाला मिळणार आहेत.

  • सध्याच्या प्रभाग ३० चेही विभाजन झाले आहे. फुगेवाडीचा काही भाग मिळून दापोडीसाठी स्वतंत्र प्रभाग झाला आहे. आणि गेटा खालचा व वरचा भाग मिळून कासारवाडीसाठी स्वतंत्र प्रभाग झाला आहे. सध्या गेटावरच्या भागाचा प्रभाग २० मध्ये समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com