esakal | पिंपरी : पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड I Municipal Employee
sakal

बोलून बातमी शोधा

money

पिंपरी : पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - दिवाळी सव्वा महिन्यावर असताना महापालिकेने मंगळवारीच (ता. २८) अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला. सर्वांना ८.३३ टक्के सानुग्रह अनुदानासह २० हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची माहिती महापौर उषा ढोरे यांनी मंगळवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेतर्फे अधिकारी, कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी बोनस व सानुग्रह अनुदान दिले जाते. गेल्या वर्षापासून सर्व अधिकारी, कर्मचारी कोरोनाविरुद्ध लढत आहेत. या संकटाच्या काळात त्यांचे योगदान मोठे आहे, असे सांगून महापौरांनी सानुग्रह अनुदान व बोनस जाहीर करत असल्याचे सांगितले. यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, आयुक्त राजेश पाटील, महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: पिंपरी : कोविड योद्धांचे ‘आऊटसोर्सिंग’ विरोधात महापालिकेसमोर आंदोलन

पंचवार्षिक करार होणार

महापालिका व कर्मचारी महासंघ यांच्यात दर पाच वर्षांनी करार होतो. गेल्या वर्षी कराराची मुदत संपली. मात्र, कोरोनामुळे नव्याने करार झाला नव्हता. आता पुढील पाच वर्षांसाठी अर्थात २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीसाठी नवीन करार करण्यात येणार आहे. त्या बाबतचा निर्णयही घेण्यात आला आहे.

महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोना काळातील योगदान मोठे आहे. त्यांचे शहर विकासातील योगदानही मोठे आहे. त्यामुळे प्रथेनुसार दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान व जादा बक्षीस रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, पुढील पाच वर्षांचा करारही केला जाणार आहे.

- उषा ढोरे, महापौर, पिंपरी-चिंचवड

कोरोना व लॉकडाऊन काळात सर्वजण घरात बसलेले होते. त्यावेळी केवळ पालिकेचे कर्मचारी व अधिकारी कामावर होते. त्यांनी चांगले काम केल्यामुळे शहराचा मृत्यूदरही कमी राहिला आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाची ही पावती आहे.

- अंबर चिंचवडे, अध्यक्ष, कर्मचारी महासंघ

loading image
go to top