पिंपरी : सोशल मीडियावर ‘इलेक्शन वॉर’

निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. कमी कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Social Media
Social MediaSakal
Summary

निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. कमी कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पिंपरी - महापालिका निवडणुकीसाठी (Pimpri Chinchwad Municipal Election) जोरदार तयारी (Preparation) सुरू आहे. आपणच कसे उजवे आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून (Interested Candidate) केला जात आहे. यासाठी सोशल मीडियाचा (Social Media) आधार घेतला जात असून सध्या सोशल मीडियावर ‘इलेक्शन वॉर’ (Election War) रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे.

निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. कमी कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी सोशल मीडियावरही जोरदार प्रचार सुरू झाला असून यासाठी अनेकांनी स्वतंत्र सेल स्थापन केला आहे. यावर दररोजच्या प्रचाराच्या घडामोडी, उमेदवाराने राबविलेले उपक्रम यासह इतर माहिती व्हायरल केली जात आहे. याबरोबरच आपलाच उमेदवार कसा योग्य आहे, हे दाखविण्यासाठी वेगवेगळी गाणी, मजकूर असलेले व्हिडिओ तयार केले जात आहेत. यातून विरोधकाला आव्हान देण्याचाही प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. सध्या अशाप्रकारचे व्हिडिओ, गाणी मोठ्याप्रमाणात सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर दरदिवशी वेगवेगळे ग्रुप तयार केले जात असून त्यामध्ये इच्छा नसतानाही अनेकांना समाविष्ट केले जात आहे. अमुक भाऊ युवा मंच, अमुक ताई महिला मंडळ, लक्ष्य २०२२ अशाप्रकारचे दोन-तीन ग्रुप दरदिवशी प्रभागात सुरु होत आहे. यावर दररोज धडकणाऱ्या मेसेजला वैतागून अनेकजण तातडीने हा ग्रुप सोडणे पसंत करीत असल्याचे दिसून येते.

Social Media
पिंपरी: पुन्हा मुळशी पॅटर्न - मोहोळ - शेलार टोळीयुद्धाचा भडका

आम्ही पत्ता करतो गुल

भावी नव्हे, फिक्स नगरसेवक, आम्ही पत्ता करतो गुल, पॉवरफुल, आमचा नाद करायचा नाय, अशाप्रकारच्या गाण्यांचे, मजकुराचे व्हिडिओ तयार करून समोरच्याला आव्हान दिले जात आहे. या कामात इच्छुकांसह त्यांचे कार्यकर्तेही जोरात असल्याचे दिसून येते. मात्र, अशा अतिउत्साहातून वादाचे प्रकार घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

चांगल्या प्रतिमेसाठी प्रयत्न

प्रभाग रचनेनंतर आरक्षण जाहीर व्हायचे असून आतापासूनच प्रचाराने जोर धरला आहे. मतदारांच्या भेटी घेण्यासह विविध कार्यक्रमांवर भर दिला जात आहे. प्रचारादरम्यान, विरोधकांची प्रतिमा त्याने केलेली चुकीचे कामेही मतदारांपर्यंत पोहोचविली जात असून स्वतःची चांगली प्रतिमा दाखविण्याचाही प्रयत्न केला जात आहे.

कार्यकर्त्यांचा अतिउत्साह

आरक्षण काय पडणार, राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळणार का नाही, हे स्पष्ट नसतानाच इच्छुकांचे फलक सर्वत्र झळकत आहेत. निवडणुकीपूर्वीच नगरसेवक झाल्याप्रमाणे अनेक ठिकाणी उल्लेख केला जातो. काही अतिउत्साही कार्यकर्ते व्हिडिओ, इमेज संबंधित इच्छुक उमेदवाराच्या परस्परच बनवितात. मात्र, त्यातील आक्षेपार्ह उल्लेख, मजकूर इच्छुकासाठी अडचणीचा ठरू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com