esakal | पिंपरी-चिंचवड : महापालिका विषय समित्या सदस्यांची निवड लांबणीवर 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड : महापालिका विषय समित्या सदस्यांची निवड लांबणीवर 
  • दिवंगत नगरसेवकांसह अन्य मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहून सर्वसाधारण सभा तहकूब 

पिंपरी-चिंचवड : महापालिका विषय समित्या सदस्यांची निवड लांबणीवर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : भाजपचे दिवंगत नगरसेवक लक्ष्मण उंडे यांच्यासह अन्य मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहून पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. 13) दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यामुळे महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, कला-क्रीडा व सांस्कृतिक आणि शिक्षण या पाच विषय समित्यांच्या सदस्यांची निवड आठवडाभर लांबणीवर पडली आहे. आजच्या सर्वसाधारण सभेत ही निवड होणार होती. त्यावर 45 नगरसेवकांना सदस्यपदाची संधी मिळणार होती. 

पिंपरी-चिंचवडकरांनो, आजचा दिवस काढावा लागणार पाण्याविना; उद्याही पाण्याची शक्यता कमीच

मुदत संपल्यामुळे महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि कला-क्रीडा व सांस्कृतिक समिती, या चार विषय समित्या 14 जून रोजी बरखास्त झाल्या आहेत. त्यानंतर पंधरा दिवसांनी शिक्षण समितीही बरखास्त झाली. त्या वेळी लॉकडाउन व जमावबंदी होती. त्यामुळे निवडणूक होऊ शकली नाही. आता व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाइन निवडणूक घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. सध्या विषय समित्यांचे अधिकार महापालिका सर्वसाधारण सभेकडे आहेत. मंगळवारी (ता. 6) दुपारी आयोजित सर्वसाधारण सभेत विषय समिती सदस्यांची निवड होणार होती. मात्र, मृतांना श्रद्धांजली वाहून सभा मंगळवार (ता. 13) दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महापालिकेची स्थायी समिती म्हणजे शहराची तिजोरी आहे. विकास कामांबाबतचे सर्व निर्णय ही समिती घेत असते. या समितीचे अध्यक्ष व नवीन सदस्यांची निवड फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यामुळे ती कार्यरत आहे. मात्र, विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, कला-क्रीडा व सांस्कृतिक आणि शिक्षण या पाच समित्यांची मुदत जूनमध्ये संपली. लॉकडाउन, संचारबंदी, जमावबंदी आदेश लागू असल्याने नवीन सदस्यांची निवड होऊ शकली. परिणामी त्या बरखास्त झाल्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना नगरसेवकांना विषय समित्यांमध्ये संधी मिळणार आहे. प्रत्येक समितीवर नऊ सदस्यांची निवड केली जाईल. त्यातून एकाची अध्यक्षपदी निवड होईल. महापालिका सभागृहातील संख्याबळानुसार नऊ सदस्यांमध्ये भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य असेल. त्या-त्या पक्षाच्या सदस्यांची नावे संबंधित पक्षाचे गटनेते सर्वसाधारण सभेत महापौरांकडे सुपूर्द करतील. त्यानंतर सदस्यांच्या नावाची घोषणा केली जाईल.