

Pimpri-Chinchwad Theatres Face Online Booking Glitches
Sakal
पिंपरी : शहरात महापालिकेची प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, अंकुशराव लांडगे नाट्यगृह, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, आचार्य अत्रे रंगमंदिर, नटसम्राट निळू फुले रंगमंदिर अशी नाट्यगृहे आहेत. यापैकी चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सर्वाधिक प्रयोग होतात. त्यापाठोपाठ निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बुकिंग होते. यापूर्वी नाट्यप्रयोगांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे बुकिंग नाट्यगृहात जाऊन केले जात होते.