पिंपरी-चिंचवडमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचं आंदोलन 

पिंपरी-चिंचवडमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचं आंदोलन 

पिंपरी : शेतकरी, कामगार, कारखानदारांचे प्रश्‍न, बेरोजगारी आदी विषय सोडविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुरुवारी (ता. 17) केंद्र सरकारच्या विरोधात पिंपरी चौकात आंदोलन केलं. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सर्वांच्या हातात केंद्र सरकारच्या निषेधाचे आणि शेतकरी, कामगार, बेरोजगार, मजूर, कारखानदार, व्यावसायिक आदींचे प्रश्‍न मांडणारे फलक होते. शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, किरण देशमुख, भागवत जवळकर, अक्षय म्हात्रे, मयूर जाधव, हर्षवर्धन भोईर, प्रतिक साळुंखे, प्रसाद कोलते, सईफ शेख, निखिल दळवी, समीर वाघज, शौरव शितोळे आदी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाकडकर म्हणाले, "केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी निर्माण झाली आहे. उच्च शिक्षितांच्या हातालाही काम मिळत नाही. डिझेल व पेट्रोलचे भाव नव्वद रुपयांपर्यंत पोचले आहेत. ही सर्वसामान्यांची लूट आहे. कोरोनाचे नाव पुढे करून स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे.'' 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जी आश्‍वासने दिली होती. त्यांची पुर्तता या सरकारने केलेली नाही. 2019 च्या निवडणुकीतही अशाच भुलथापा मारून हे सरकार सत्तेवर आलेले आहे. सर्वसामान्य नागरिकांसह उद्योजक व कारखानदारांवरसुद्धा या सरकारकडून अन्याय केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com