

Joint Survey Conducted to Identify Obstructive Bus Stops
Sakal
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक राजेश जाधव, पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त (वाहतूक शाखा) विवेक पाटील आणि महापालिकेचे स्थापत्य विभाग यांच्या नियंत्रणाखाली पिंपरी चिंचवड शहर आणि पीएमआरडीए हद्दीतील पीएमपीएमएल बसथांब्याचा संयुक्त सर्व्हे करण्यात आला. या वेळी अरुंद रस्ते, चौक आणि सिग्नलच्या जवळ असलेले सुमारे ५० ते ५५ बस थांबे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होणार असल्याचा दावा तीनही प्राधिकरणांनी केला आहे.