
गजानन पंढरीनाथ मारणे (रा. कोथरूड) व त्याच्या 100 ते 150 समर्थकांकर गुन्हा दाखल आहे. पप्पू गावडे व अमोल बधे खून प्रकरणात मारणे याची निर्दोष मुक्तता झाल्याने सोमवारी (ता. 15) सायंकाळी त्याला नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सोडण्यात आले.
पिंपरी : खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गुंड गजानन मारणे याची त्याच्या समर्थकांनी कारागृहापासून मोठी मिरवणूक काढली. मुंबई बंगळुरू महामार्गावरील पवना पूल ते चांदणी चौक या मार्गावर हा प्रकार घटला. तीस ते पस्तीस वाहनातून बेकायदेशीर रॅली काढून बेकायदेशीर जमाव जमवून वाहन चालकांना शिविगाळ करीत दहशतीचे वातावरण निर्माण केली. याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारांवर हिंजवडी पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच शिरगाव पोलिस चौकीत पहिला गुन्हा दाखल झालेला आहे.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गजानन पंढरीनाथ मारणे (रा. कोथरूड) व त्याच्या 100 ते 150 समर्थकांकर गुन्हा दाखल आहे. पप्पू गावडे व अमोल बधे खून प्रकरणात मारणे याची निर्दोष मुक्तता झाल्याने सोमवारी (ता. 15) सायंकाळी त्याला नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सोडण्यात आले. त्यानंतर कारागृहाबाहेर गर्दी केलेल्या त्याच्या समर्थकांनी कारागृहापासून घरापर्यंत मारणे याची मिरवणूक काढली. दरम्यान, पवना पूल ते चांदणी चौक या मार्गावर दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने बेकायदेशीर जमाव जमवला. तीस ते पस्तीस वाहनांमधून आलेल्या मारणे व त्याच्या दीडशे ते दोनशे समर्थकांनी घोषणाबाजी करीत बेकायदेशीर रॅली काढली. इतर वाहनचालकांना पुढे जाऊ न देता त्यांना शिविगाळ करीत दहशतीचे वातावरण निर्माण केले. पोलिसांनी वाहन चालकांना थांबण्याचा इशारा केला असता ते निघून गेले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचा - सावधान! पुणेकरांनो कोरोना वाढतोय बरं का, काळजी घ्या
दरम्यान, बेकायदेशीर जमाव जमवून दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच शिरगाव पोलिस चौकीतही मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झालेला आहे.