esakal | पिंपरी : फॅन्सी नंबर प्लेट बनवल्यास दुकानचालकांवर होणार कायदेशीर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : फॅन्सी नंबर प्लेट बनवल्यास दुकानचालकांवर होणार कायदेशीर कारवाई

फॅन्सी नंबर प्लेट बनवून दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित दुकानचालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 

पिंपरी : फॅन्सी नंबर प्लेट बनवल्यास दुकानचालकांवर होणार कायदेशीर कारवाई

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : अनेक गुन्हेगार बनावट, फॅन्सी नंबर प्लेट वाहनांना बसवून त्यांचा गुन्ह्यांमध्ये वापर करतात. परिणामी ही वाहने व आरोपी तत्काळ सापडत नाहीत. त्यामुळे नंबर प्लेट बनविताना संबंधित वाहनाचे कागदपत्रे घेणे, तसेच स्वतंत्र रजिस्टर ठेवून त्यात नंबर प्लेटनुसार वाहनांच्या नोंदी ठेवणे हे नंबर प्लेट बनविणाऱ्या दुकानदारांना बंधनकारक केले आहे. यापुढे फॅन्सी नंबर प्लेट बनवून दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित दुकानचालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून विनापरवाना वाहनामध्ये फेरबदल करीत असून, नमुन्यातील नंबर प्लेटऐवजी त्यामध्ये बदल करून फॅन्सी नंबर प्लेट वापरत आहेत. त्यामुळे नंबर प्लेट बनविताना संबंधित वाहनाचे कागदपत्रे घेण्यासह यासाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवून त्यामध्ये नंबर प्लेटनुसार वाहनांच्या नोंदी ठेवाव्यात. तसेच, गॅरेजचालकांनी परिवहन विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही वाहनाच्या मूळ साच्यामध्ये फेरबदल करू नयेत. वाहतूक कायद्यातील नियमांचे उल्लंघन करून वाहनामध्ये बेकायदेशीररीत्या फेरबदल केल्यास संबंधित दुकानचालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.