
पिंपरी : औद्योगिक क्षेत्रात सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी चाकण व महाळुंगे एमआयडीसी ठाण्यांचे विभाजन करून दोन स्वतंत्र पोलिस ठाणे आणि औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र परिमंडळ निर्माण करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून प्रस्तावित आहे.