Pimpri Chinchwad: मालमत्ता कर सवलतीत भरण्याचा आज शेवटचा दिवस; संधीचा फायदा घेण्याचे पालिकेचे आवाहन
Property Tax: पिंपरी-चिंचवड महापालिकेने मालमत्ता कर भरणाऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत कर भरल्यास ४% सवलत जाहीर केली आहे. ही सवलत घेण्यासाठी नागरिकांनी तातडीने कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाने मालमत्ताधारकांना विशेष सवलत जाहीर केली आहे. चालू आर्थिक वर्षातील मालमत्ताकराचा पूर्ण भरणा ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन केल्यास सामान्य करावर चार टक्के सूट मिळणार आहे.