esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये आज सर्वांत नीचांकी रुग्णसंख्येची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये आज सर्वांत नीचांकी रुग्णसंख्येची नोंद
  • आज केवळ 76 रुग्णांची नोंद
  • 409 जणांना डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये आज सर्वांत नीचांकी रुग्णसंख्येची नोंद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 76 आणि पालिका हद्दीबाहेरील तीन, अशा 79 नवीन रुग्णांची सोमवारी (ता. 9) नोंद झाली आहे.
 गेल्या गेल्या पाच महिन्यांतील आजची रुग्णसंख्या सर्वांत कमी आहे. शहरासाठी ही दिलासादायक बाब आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 88 हजार 878 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 409 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील आज आकुर्डीतील 66 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. काल शहरातील एकाचाही मृत्यू झाला नव्हता. शहरातील मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे. हे मोठे आशादायक चित्र आहे. तसेच, आज शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात आजपर्यंत 88 हजार 878 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 85 हजार 884 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1547 जणांचा, तसेच शहराबाहेरील परंतु महापालिका रुग्णालयात उपचार घेणार्‍या 639, अशा 2186 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 760 सक्रीय रुग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तसेच, 966 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.