
Pimpri Chinchwad News
Sakal
पिंपरी : पाऊस, खड्डे, दुरुस्ती आणि पुन्हा पाऊस, पुन्हा खड्डे, पुन्हा दुरुस्ती अशी रस्त्यांच्या स्थितीची वारंवारिताच जणू पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत बघायला मिळत आहे. यामुळे वाहनचालकांसह सामान्य नागरिक त्रस्त आहेत. यावर उपाययोजना म्हणून महापालिका रस्त्यांची डागडुजी करीत असून, ती तात्पुरती मलमपट्टी ठरत आहे. ‘खड्डेमुक्त रस्त्यांसाठी डांबरीकरण हाच प्रभावी उपाय’ आहे. मात्र, पावसामुळे रस्ते डांबरीकरणाचे कोणतेही नियोजन नसल्याचे सांगत महापालिका प्रशासन हतबलता दर्शवीत आहे. त्यामुळे तूर्त तरी डांबरीऐवजी खड्डेमय रस्त्यांचाच नागरिकांना वापर करावा लागणार आहे.