Wed, March 29, 2023

Pimpri chinchwad : रूपीनगरला वाहनांची तोडफोड ; आरोपी पसार
Published on : 11 March 2023, 7:00 am
पिंपरी : रुपीनगर येथे तीन जणांनी वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली त्यामध्ये वाहनांचे नुकसान झाले आहे. रूपीनगर येथील सरस्वती शाळेजवळ या गाड्या उभे केलेले होत्या. दरम्यान , तिथे आलेल्या तिघांनी कोयत्याने सात ते आठ गाड्यांच्या काचा फोडल्या. ही घटना काही वेळानंतर उघडकीस आली.
तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.