हिंजवडी, पिंपळे गुरवमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; 36 लाखांचा गुटखा केला जप्त 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 December 2020

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे सामाजिक सुरक्षा पथक व सांगवी पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत 36 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे सामाजिक सुरक्षा पथक व सांगवी पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत 36 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हिंजवडीतील साखरे वस्ती येथे एक जण गुटखा विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार वेषांतर करून दहा दिवस पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. बुधवारी (ता. 10) सकाळी सहाच्या सुमारास साखरे वस्ती रोड येथील हुलावळे बेंद्रे वस्ती येथे एका खोलीतून दोन मोटारीतून गुटखा घेऊन जात असल्याचे निदर्शनास येताच पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. 31 लाख 45 हजार 714 रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा, बारा लाख 25 हजार रुपये किमतीची वाहने, तेरा हजारांचे दोन मोबाईल, असा एकूण 43 लाख 83 हजार 714 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कारवाईत श्याम शंकरलाल चौधरी (वय 32), पारसराम चौथाराम मेगवाल (वय 45), ललीत गोविंदराम खारोल (वय 23, तिघेही रा. साखरेवस्ती रोड, हुलावळे बेंद्रे वस्ती, फेज 1, हिंजवडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 
तसेच, दुसरी कारवाई पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ करण्यात आली. विक्रीसाठी आणलेला पाच लाख 25 हजार 25 रुपये किमतीचा गुटखा सांगवी पोलिसांनी जप्त केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कारवाईत संजयचंद्र भूषणसिंग ठाकूर (वय 45, रा. ममता सोसायटी, चंदननगर, वडगावशेरी) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. अधिक तपास सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad sangavi police seize 36 lakh tabacco at hinjewadi, pimple gurav