esakal | Pimpri Update : शहरात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona updates

Pimpri Update : शहरात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी (ता. ९) १२३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. शहरातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आज १०० जणांना घरी सोडण्यात आले. सध्या रूग्णालयांत ३५२ रूग्ण उपचार घेत आहेत.

हेही वाचा: परमबीर सिंह यांच्या घरावर मुंबई पोलिसांची नोटीस

एकूण रूग्णसंख्या २ लाख ७४ हजार ७२९ झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या एकूण रूग्णांची संख्या २ लाख ७० हजार ८४ झाली आहे. सध्या ५६५ सक्रिय रूग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील ४ हजार ४५९ जणांचा मृत्यू झाला आहे. ५६५ गृहविलगीकरणात आहेत. आज ३ हजार ५६२ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.

हेही वाचा: Lakhimpur violence: आशिष मिश्रा पोलिसांसमोर हजर

आजवर २० लाख ६५ हजार ८३३ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात ४५ मेजर कन्टेंनमेंट झोन संख्या तर मायक्रो कन्टेंनमेंट झोनची संख्या ३७९ आहे. कन्टेंनमेंट झोनमधील ४२७ घरांना स्वयंसेवकांनी दैनंदिन भेट दिली. १ हजार ५९९ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

loading image
go to top