Pimpri chinchwad : अभिनेत्री कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - शिवसेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेत्री कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - शिवसेना

अभिनेत्री कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - शिवसेना

पिंपरी : स्वातंत्र्य सेनानी व देशाचा अवमान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा करा, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्यावतीने निगडी पोलिसांकडे केली आहे. शिवसेना शिरूर जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्‍वजीत खुळे (गुन्हे) यांना आज (ता.१३) याविषयी निवेदन दिले आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान

‘भारताला १९४७ रोजी जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक म्हणून मिळाले, खरे स्वातंत्र्य तर २०१४ ला मिळाले’ असे वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने एका वृत्त वाहिनी वर मुलाखत देताना केले. कंगना राणावत हिने स्वातंत्र्य सैनिक व देशासाठी शहीद झालेल्या शहीदांचा अवमान केला आहे. अशी सतत वादग्रस्त विधाने करणा-या कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

loading image
go to top