
अमोल शित्रे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकसित होत असले तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांना ‘केबल सिटी’त राहतोय की काय? असा प्रश्न पडू लागला आहे. शहरातील उड्डाणपूल, मुख्य रस्त्यांवरील पथदिवे तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये एका खांबावरून दुसऱ्या खांबावर अनधिकृतपणे टाकलेल्या केबलचे जाळे निर्माण झाले आहे. खासगी सेवा पुरवणाऱ्या नामांकित कंपन्यांनी अंदाधुंद पद्धतीने टाकलेल्या या केबलमुळे शहराचे सौंदर्य हरवत चालले आहे. त्याचबरोबर गंभीर अपघाताचा धोका वाढला आहे.