
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मुख्य रस्त्यांसह महामार्गावरही झुंडीने कुत्री फिरताना दिसत आहेत.पादचारी व दुचाकीस्वारांवर त्यांच्याकडून हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
पिंपरी - शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सुरू आहे. झुंडीने कुत्रे फिरत असून, दुचाकीस्वार व पादचाऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या बंदोबस्ताचे काय? किती कुत्री रोज पकडली जातात? त्यांच्यावर निर्बिजिकरण व संतती नियमन शस्त्रक्रिया किती प्रमाणात केल्या जातात? अशा प्रश्नांची सरबत्ती करीत स्थायी समिती सभेत पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला. दरम्यान, कुत्र्यांबाबतच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यावर चर्चा झाली.
पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मुख्य रस्त्यांसह महामार्गावरही झुंडीने कुत्री फिरताना दिसत आहेत. पादचारी व दुचाकीस्वारांवर त्यांच्याकडून हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या तीन-चार महिन्यात हिंजवडी रस्ता, वाकड, पिंपळे निलख, सांगवी, दिघी, मोरवाडी, यमुनानगर, त्रिवेणीनगर आदी भागांमध्ये कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. कुत्र्यांवर निर्बिजिकरण व संततीनियमन शस्त्रक्रिया नियमितपणे केली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या बाबत महापालिका स्थायी समिती सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यावर, प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. स्थायी समिती सभापती संतोष लोंढे म्हणाले, ""मोकाट कुत्र्यांचा शोध घेण्यासाठी व त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी एजन्सी नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे.''