esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये या भागात पाण्याअभावी होताहेत नागरिकांचे हाल

बोलून बातमी शोधा

Water-Supply}

‘महापालिकेने शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. मात्र, चऱ्होली, वडमुखवाडी व मोशी प्रभाग क्रमांक तीनमधील काही भागात चार-चार दिवस पाणी मिळत नाही. याला महापालिकेचा ‘इ’ प्रभाग आणि डब्ल्यूडी चारचे अधिकारी जबाबदार आहेत,’’ असा आरोप नगरसेविका सुवर्णा बुर्डे यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये या भागात पाण्याअभावी होताहेत नागरिकांचे हाल
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भोसरी - ‘महापालिकेने शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. मात्र, चऱ्होली, वडमुखवाडी व मोशी प्रभाग क्रमांक तीनमधील काही भागात चार-चार दिवस पाणी मिळत नाही. याला महापालिकेचा ‘इ’ प्रभाग आणि डब्ल्यूडी चारचे अधिकारी जबाबदार आहेत,’’ असा आरोप नगरसेविका सुवर्णा बुर्डे यांनी केला आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधील चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, डुडुळगाव, मोशी, गंधर्वनगरी, भोसरीतील साईनाथ कॉलनी, अक्षयनगर, आनंदनगर आदी भागातील पाणीपुरवठा चार-चार दिवसांनी केला जातो. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असा बुर्डे यांनी केला आहे. प्रभाग क्रमांक तीनमधील पठारेमळा, बुर्डेवस्ती, गंधर्वनगरी, लक्ष्मीनगर हा उंच ठिकाणाचा भाग आहे. त्याचप्रमाणे डब्ल्यूडी चार इंद्रायणीनगरमधील पाण्याच्या टाकीमधून पुरवठा होत नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाणीपुरवठा अधिकाऱ्‍यांशी संपर्क साधल्यावर मोटर बंद आहे, पाण्याची पातळी नाही, चार मोटारपैकी एक-दोन मोटारच सुरू आहेत, अशी अधिकारी देत असल्याची तक्रार महिलेने केली.

दरम्यान, पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. त्याचप्रमाणे पाणी सोडण्याच्या अयोग्य वेळांमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका आणि डब्ल्यूडीद्वारे पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास अधिकाऱ्यांविरोधात महिला आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शटडाउन झाल्यावर आणि वीजपुरवठा खंडित असल्यावर परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. गुरुवारी शटडाउन होते. त्याचप्रमाणे स्पाईन रोड आणि मोशीमध्ये पाण्याच्या पाइपलाइनमध्ये बिघाड झाला होता. चऱ्होली फाट्यावरही पाण्याचा वाल्व्ह नादुरुस्त झाला होता. त्यामुळे प्रभाग क्रमांक तीनमध्ये काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला. दोन दिवसांत परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल.
- रामनाथ टकले, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आणि डब्ल्यूडी चारच्या अधिकाऱ्यांशी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये बैठक घेण्यात येईल. प्रभाग क्रमांक तीनमध्ये असलेली पाण्याची समस्या लवकरच सोडण्यात येईल.
- सुवर्णा बुर्डे, नगरसेविका

Edited By - Prashant Patil