
Pimpri Chinchwad News
Sakal
पिंपरी : डांगे चौक ते चिंचवड या मार्गाच्या विकासाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग असलेल्या पदपथाचे काम पदोपदी रखडल्याची स्थिती आहे. त्यामुळे पावलोपावली अडखळण्याचा धोका टाळण्यासाठी परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते आहे.