

CM Devendra Fadnavis paying tribute while recalling Laxman Jagtap’s contribution to Pimpri-Chinchwad’s development.
sakal
पिंपरी: ‘‘दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे मातीतून उभे राहिलेले नेतृत्व होते. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर पिंपरी चिंचवडमध्ये भक्कम आणि विश्वासार्ह नेतृत्व उभे केले. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवणे हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या विकासाचे श्रेय जगताप यांना देत त्यांनी अप्रत्यक्षपणे स्थानिक आमदारांसह विरोधकांच्या दाव्यांना छेद दिला.