Pimpri Chinchwad News: एचआयव्ही रुग्णांसह कर्मचारी वाऱ्यावर, अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव

त्यानंतर पीपीपी तत्त्वावर ‘बीव्हीजी’ला सेंटर चालविण्यास दिले. मग तेच १३ पैकी १० कर्मचारी बीव्हीजीत समाविष्ट झाले.
Pimpri Chinchwad
Pimpri Chinchwadsakal

पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील एचआयव्ही रुग्णावर उपचार करणाऱ्या ‘एआरटी’ (ॲंटी रीट्रोव्हायरल थेरपी) केंद्रातील अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे हे केंद्र बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.

या केंद्राअंतर्गत उपचार घेणाऱ्या सर्व एचआयव्ही रुग्णांना जिल्ह्यातील जवळच्या इतर एआरटी केंद्रामध्ये स्थलांतरित करण्याचा घाट घातल्याची माहिती समोर आली आहे.

ही प्रक्रिया ३० ऑगस्टअखेरपर्यंत संपवून कार्यवाहीचा अहवाल महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेकडे (मराएनिस) सादर करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. परिणामी, या निर्णयामुळे एचआयव्ही रुग्णांसह कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Pimpri Chinchwad
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार-कंटेनरचा भीषण अपघात; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ४ जण जखमी

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात एचआयव्ही रुग्णांसाठी २००८ पासून एआरटी केंद्र सुरू आहे. मागील १४ वर्षांपासून बजाज कंपनीच्‍या सीएसआर फंडातून २०२१ पर्यंत एचआयव्ही रुग्णांना उपचार देण्यात येत होते. पण, बजाज आणि समन्वय अधिकारी यांच्यातील समन्वयाअभावी कंपनीने फंड बंद केला. त्यानंतर पीपीपी तत्त्वावर ‘बीव्हीजी’ला सेंटर चालविण्यास दिले. मग तेच १३ पैकी १० कर्मचारी बीव्हीजीत समाविष्ट झाले.

Pimpri Chinchwad
Mumbai Crime : कल्याणमध्ये पुन्हा धक्कादायक घटना; 5 वर्षीय मुलावर डान्स शिक्षकाचा लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

एआरटी केंद्र बंद करण्याचा घाट? रुग्ण आणि कर्मचारी वाऱ्यावर

दर अकरा महिन्‍यांनी या कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रक्ट नूतनीकरण करणे आवश्‍यक आहे. पण, तसा प्रस्ताव वेळेत सादर होत नाही.

या केंद्रावर आतापर्यंत १९ हजार ३०० रुग्णांची येथे उपचार घेतल्याची नोंद आहे. दर महिन्याला सहा हजार रूग्ण औषधोपचार घेतात. समन्वय अधिकारी यांचा महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी आणि जिल्हा एड्स नियंत्रण संस्था यांच्यात योग्य समन्वय नसल्याने १५ वर्षांपासून काम करणारे कर्मचारी आणि रुग्ण वाऱ्यावर येण्याची वेळ आली आहे. (Latest Marathi News)

स्थलांतरित करण्याचे मेलद्वारे आदेश

वायसीएम एआरटी केंद्रामध्ये उपचार घेत असलेल्या सर्व पीएलएचआयव्ही रुग्णांना या जिल्ह्यातील जवळच्या इतर एआरटी केंद्रामध्ये उपचारासाठी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करावी. ज्यामुळे भविष्यात रुग्णांची गैरसोय होणार नाही. ही प्रक्रिया महिना अखेरपर्यंत संपविण्यास सांगितली आहे.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुधीर सरोदे आणि विभागीय माहिती व्यवस्थापक शिवधर गलांडे यांनी या बाबत पाठपुरावा करावा, असे आदेश महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (मराएनिस) काळजी आधार व उपचार विभागाचे सहायक संचालक प्रदीप सोनवणे यांनी ईमेलद्वारे दिले आहे. तसा मेल वायसीएम अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनाही पाठविण्यात आला आहे.

समन्वय अधिकारी सुटीवर

या केंद्रामधील रुग्णांना इतरत्र हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे केंद्राचे समन्वय अधिकारी डॉ. नितीन मोकाशी सुटीवर आहे. त्यामुळे केंद्राचा अहवाल कोण पाठविणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या बाबत विचारणा करण्यासाठी संपर्क केला. पण, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

Pimpri Chinchwad
Pune Crime : घरफोडीतील दागिने विकण्यासाठी आलेल्या चोरट्यास अटक

केंद्र बंद झाल्यास हजारो रुग्णांची हेळसांड

वायसीएम एआरटी केंद्रात या रुग्णांच्या विविध तपासण्‍या केल्या जातात. त्यांची ओपीडी बाहेरील बाजूला केल्यामुळे इतरांपासून ओळख लपविण्यास मदत होत आहे. त्यांना औषध दिले जातात. त्या रुग्णांच्या इतर रक्त तपासण्या केल्या जातात.

सीडीफोर आणि व्हायरल लोड या दोन महत्त्वाच्या तपासण्या होत आहेत. वायसीएम मध्यवर्ती रुग्णालय असल्यामुळे रुग्णांना ये-जा करण्यासाठी उपयुक्त होत आहे.

या रुग्णालयात जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येत असतात. परिणामी, हे केंद्र बंद करून येथील रुग्णांना इतरत्र हलविण्यात आल्यावर हजारो रुग्णांची हेळसांड होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com