esakal | Pimpri: शहरातील १७२ शाळांची संच मान्यतेची अपूर्ण माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा

पिंपरी : शहरातील १७२ शाळांची संच मान्यतेची अपूर्ण माहिती

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी : खासगी अनुदानित शाळांमधील सुधारित शिक्षकेतर कर्मचारी आकृतिबंधानुसार शिक्षकेतर पदे निश्‍चित करण्यासाठी संच मान्यता घ्यावी लागते. परंतू शहरातील १७२ शाळांनी अद्याप संचमान्यतेची माहिती पूर्ण भरली नसल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित शाळांना माहिती त्वरीत भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्राथमिक ते माध्यमिक शाळा आणि तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी होण्याच्या दृष्टीने सरकारतर्फे संचमान्यता करण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी ही संचमान्यता रद्द करण्यात आली होती. मात्र यंदा २०१९-२० व २०२०-२१ वर्षाच्या संचमान्यता करण्याचे ठरवले आहे. परंतू यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचा आधार क्रमांकाची स्टूडंट पोर्टलवर नोंदणी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे आधार अद्याप काढले नसेल किंवा अपडेट नसेल तर तत्काळ शाळांनी काढावे, असे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी आदेश दिले होते.

हेही वाचा: पिंपरी : मुसळधार पाऊसामुळे विविध भागातील विद्युत पूरवठा खंडीत

शाळांनी विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती अद्ययावत केल्याशिवाय शिक्षकांची पदे निश्चित होणार नाहीत. सुधारित संचमान्यता तयार करून ती तपासून अंतिम करण्यासाठी शाळांना ३० सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार मुदतीतच शाळांनी सर्व कामे पूर्ण करणे बंधनकारक आहे. परंतू अनेक शाळांनी संच मान्यता तयारच केली नाही. शासनाच्या ७ मार्च २०१९ च्या निर्णयान्वये माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध शासनाने निश्‍चित केलेला आहे. अनुदानित वर्गातील विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकेतर पदे निश्‍चित करण्यासाठी संचमान्यता तयार करावी लागणार आहे.

मुख्याध्यापकांची बैठक

केंद्रप्रमुखांना शाळांकडून प्राप्त झालेली विद्यार्थ्यांची माहिती तपासून ती मंजूर करण्यात येणार आहे. यानंतर शिक्षण संचालनालयास पदनिश्‍चितीसाठी विभागाचा प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. यासाठी ज्या शाळांनी संच मान्यतेची माहिती भरली नाही, अशा मुख्याध्यापकांची बैठक प्राथमिक शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांनी ऑनलाइन बोलविण्यात आली होती. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखांना सुचना केल्या आहेत.

loading image
go to top