esakal | Pimpri: मुसळधार पाऊसामुळे विविध भागातील विद्युत पूरवठा खंडीत
sakal

बोलून बातमी शोधा

वीज पुरवठा

पिंपरी : मुसळधार पाऊसामुळे विविध भागातील विद्युत पूरवठा खंडीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सलग दोन दिवसांपासून होत असल्यामुळे मुसळधार पाऊसामुळे शहरातील विविध भागातील विद्युत पूरवठा खंडीत झाला आहे. निगडी ओटास्किम आणि रहाटणी काळेवाडी परिसरातील नागरीकांनी रात्र जागून काढली.

रहाटणी काळेवाडी परिसरात महावितरण अक्षरशः अखंड वीजपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. कोरोना सारखा महामारीचा काळ असो वा गणेशोत्सव, नवरात्र किंवा विद्यार्थ्यांचा परीक्षेचा काळ काळेवाडी परिसर कायम अंधारात सापडत आहे. दुरुस्तीची कामाच्या वेळच्यावेळी पुर्व सुचना न देता वीजपुरवठा खंडित करण्यात तर वीजकंपनी पटाईत असल्याचे स्थानिक नागरीक सुरेंद्र पवार यांनी सांगितले.

हेही वाचा: दक्षिण मुंबईतील 67 घरे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीत

पावसामुळे दररोज ५ ते ६ ताससुध्दा वीज गायब होते. कधी कधी ऐन मध्यरात्री वीज जाते, खूप त्रास होतो. परिस्थिती लवकरात लवकर बदलावी व काळेवाडी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत व सुरक्षित करण्याची नागरीकांची मागणी आहे. वीजपुरवठा सतत खंडीत होत, असेल तर नागरीकांच्यावतीने जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

१५ तास निगडी परिसर अंधारात

निगडी ओटास्किम इमारत क्रमांक १०मध्ये शनिवारी सकाळी अकरा वाजता विद्युत पूरवठा खंडीत झाला. त्यानंतर महावितरणची वायर जळाल्यामुळे८ ते १३ इमारतीमध्ये वीज गेली. स्थानिकांनी त्वरीत महावितरण विभागाला कळविल्यानंतर केबल टेस्ट व्हॅन व विद्युत विभागाचे कर्मचाऱ्यांनी रविवारी (ता.१०) सकाळी दुरूस्ती करण्यात आली. मध्यरात्री २ वाजता विद्युत पूरवठा पूर्ववत झाला. तोवर नागरीकांनी पूर्ण दिवस अंधारात घालविला. दरम्यान मोशी, डुडूळगाव परिसरातदेखील रात्री एक वाजेपर्यत वीज नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली.

loading image
go to top