esakal | Pimpri: आजपासून रोज १० तास लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

पिंपरी : आजपासून रोज १० तास लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सोमवारी (ता. ११) महापालिकेचा वर्धापनदिन आहे. त्यामुळे शनिवारपासून (ता. ९) सोमवारपर्यंत ६५ केंद्रांवर सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी कोव्हॅक्सिन लसीचे दररोज दोन हजार ५०० आणि कोव्हिशिल्ड लसीचे ३१ हजार २०० असे ३३ हजार ७०० डोस उपलब्ध झाले आहेत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे. ५० टक्के डोस किओक्स यंत्राद्वारे व ५० टक्के डोस ऑन दि स्पॉट नोंदणी करून दिले जाणार आहेत, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवले आहे.

ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. मात्र, पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी पिंपरीतील नवीन जिजामाता रुग्णालयात दोनशे डोस राखीव आहेत.

हेही वाचा: पुणे : विद्यमान २७ नगरसेवकांचे भवितव्य अस्पष्ट

गर्भवतींसाठी स्वतंत्र व्यवस्था

स्तनदा माता व गर्भवतींसाठी जुने भोसरी रुग्णालय, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर, आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्याबाई होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे.

loading image
go to top