पद्मश्री सन्मान मिळाल्याबद्दल पिंपरी-चिंचवडमधील संस्थांतर्फे गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : गिरीश प्रभुणे यांचा सपत्निक नागरी सत्कार

पिंपरी : गिरीश प्रभुणे यांचा सपत्निक नागरी सत्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातर्फे विविध संस्था, संघटनांनी समाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांचा सपत्निक गौरव केला. ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. नारायणमहाराज जाधव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ज्ञानेश्वरी, तुकोबांची पगडी आणि वारकरी उपरणे प्रदान केले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम झाला. महापौर उषा ढोरे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, प्रभुणे यांच्या पत्नी अरुंधती प्रभुणे आदी उपस्थित होते. ‘पद्मश्री’ हा पिंपरी-चिंचवडच्या इतिहासातील एक पावन क्षण आहे, असे मत नारायणमहाराज यांनी व्यक्त केले. विद्यार्थिदशेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेचे संस्कार, बिकट प्रसंगांमध्ये पत्नीने दिलेली अखंड साथ, भटके विमुक्त परिषद, पारधी, समरसता परिषदेचे असंख्य नि:स्वार्थी कार्यकर्ते आणि आयुष्यात आलेल्या विविध महनीय व्यक्तींचा हा पुरस्कार आहे, अशी भावना प्रभुणे यांनी व्यक्त केली. समरसता पुनरुत्थान गुरुकुलममधील विद्यार्थिनींनी संस्कृतमध्ये स्वागतगीत सादर केले. श्रीकांत चौगुले यांनी प्रभुणे यांचा जीवनपट मांडला.

हेही वाचा: Corona Update : राज्यात नव्या 848 कोरोना रुग्णांची भर

मसाप भोसरी व पिंपरी-चिंचवड शाखा, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य-कला अकादमी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, लायन्स क्लब भोजापूर गोल्ड, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, कलारंग प्रतिष्ठान, बंधुता प्रतिष्ठान, शब्दधन काव्यमंच, अक्षरभारती, समरसता साहित्य परिषद, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान, स्वयंसिद्धा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, साहित्य संवर्धन समिती, पिंपरी-चिंचवड साहित्य मंच संस्था यांनी संयोजन केले.

loading image
go to top