Corona Update : राज्यात नव्या 848 कोरोना रुग्णांची भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update
Corona Update : राज्यात नव्या 848 कोरोना रुग्णांची भर

Corona Update : राज्यात नव्या 848 कोरोना रुग्णांची भर

मुंबई : दैनंदिन कोविडबाधित रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं असून राज्यात 50 रुग्ण दगावले आहेत. काल ही संख्या 41 वर होती. पण दैनंदिन रुग्णसंख्या काहीशी कमी होऊन 848 झाली आहे. दरम्यान, कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,79,396 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.68 टक्के एवढं झालं आहे.

हेही वाचा: राज्यात 11 कोटी डोस पूर्ण; लसीकरणात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर

राज्यातील मृतांचा एकूण आकडा 1,40,857 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 9,187 इतकी आहे, आज 848 रुग्णांसह करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 66,33,105 झाली आहे.

हेही वाचा: पाटण आगारातून एसटी सेवा सुरु; पहिली फेरी पोलिस बंदोबस्तात!

औरंगाबाद, अकोला, नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 19, नाशिक 19, पुणे 10, कोल्हापूर 1, लातूर 1 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 90,538 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 1065 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

loading image
go to top