
पिंपरी : पेय खरेदीच्या बहाण्याने चोरट्याने किराणा दुकानदाराची सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिकार केला असता चोरट्याने गोळीबार केला. यामध्ये दुकानदार तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १) दुपारी पिंपरी कॅम्प भागात साई चौकाजवळ घडली.