पिंपरी : पोलिसांवर गोळीबार केलेल्या गुन्हेगारी टोळीवर मोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

पिंपरी : पोलिसांवर गोळीबार केलेल्या गुन्हेगारी टोळीवर मोका

पिंपरी : पिंपळे गुरव येथे गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून केला. त्यानंतर पसार झालेल्या या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही त्यांनी गोळीबार केला. या गुन्हेगारी टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई केली. (Pimpri Crime News)

टोळीप्रमुख गणेश हनुमंत मोटे (वय २३, रा. कवडेनगर, सांगवी ), अश्विन आनंदराव चव्हाण (वय २१, रा. विनायकनगर, सांगवी ) , महेश तुकाराम माने (वय २३, रा. कवडेनगर, सांगवी ), गणेश बाजीराव ढमाले (वय ३४, रा. ढमाले चाळ, जुनी सांगवी), अक्षय गणेश केंगले (वय २१, रा. भीमाशंकर कॉलनी, पिंपळे गुरव ), प्रथमेश संदीप लोंढे (वय २४, रा. कसबा चौक, बारामती ), मुजम्मिल इस्माईल अत्तार (वय १९, रा. भारतमातानगर, दिघी ), अभिजित भागुजी वारे (वय १८, रा. पिंपळे गुरव ), गणेश उर्फ मोनू सुनील संकपाळ (वय २१, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी ), अभिजित बाजीराव ढमाले ( ढमाले चाळ, जुनी सांगवी ), निखिल उर्फ डोक्या अशोक गाडुते (रा. जुनी सांगवी), राजन उर्फ बबलू रवी नायर (रा. सांगवी ), नीलेश मुरलीधर इयर (रा. कवडेनगर, सांगवी ) व एक अल्पवयीन मुलगा अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा: युक्रेनमध्ये अडकलेल्या २१९ भारतीयांना घेऊन पहिलं विमान मुंबईत दाखल

या आरोपींवर कट रचून खून करणे, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा करून खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, घातक शस्त्र बाळगून दहशत माजविणे असे पंचवीस गुन्हे दाखल आहेत. या आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका ) कारवाई करण्यात आली. या टोळीने १८ डिसेंबर २०२१ ला पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकात तडीपार आरोपी गणेश मोटे याच्यासह त्याच्या टोळीने पूर्ववैमनस्यातून योगेश जगताप या सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून केला.

यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, गणेश मोटे, महेश माने, अश्विन चव्हाण हे खेड तालुक्यातील कोये-कुरकुंडी येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचला. पोलिस आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेले असता आरोपींनी पोलिस पथकावर गोळीबार केला. यामध्ये पोलिस आयुक्तांसह अधिकारी, कर्मचारी जखमी झाले.

Web Title: Pimpri Crime News Moka Firing Gang

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pimpricrime
go to top