

Pimpri Hearing And Speech Initiative Helps 1200 Deaf Children With 400 Plus Surgeries And Early Language Training Support
sakal
पिंपरी: मुलगी असो वा मुलगा, बाळाचा जन्म झाल्याचा आनंद प्रत्येक घरात असतो. प्रत्येक माता-पित्याला असतो. परंतु, ते बाळ दोन-अडीच वर्षांचे झाले तरी बोलत नाही, त्याला आवाज दिला तरी प्रतिसाद देत नाही, अशा वेळी मनात धाकधूक निर्माण होते. त्याच्या वैद्यकीय तपासणीत ते कर्णबधिर असल्याचे कळते आणि भावनिक धक्का बसतो. परंतु, अशा चारशेहून अधिक मुलांवर शस्रक्रिया करून कर्णबधिरतेवर मात केली आहे. त्यांच्यासह बाराशेहून अधिक मुलांना ऐकू येऊ लागले आहे. ते बोलू लागले आहेत. इतकेच नव्हे तर उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरी व व्यवसाय करीत आहेत. ही किमया साधली आहे, ‘काक्लिआ पुणे फॉर हिअरिंग अॅण्ड स्पीच’ या सेवाभावी संस्थेमुळे...