esakal | पिंपरी : ‘सरल’च्या नोंदीत आधारमध्ये विद्यार्थ्यांची डबल नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Students
पिंपरी : ‘सरल’च्या नोंदीत आधारमध्ये विद्यार्थ्यांची डबल नोंद

पिंपरी : ‘सरल’च्या नोंदीत आधारमध्ये विद्यार्थ्यांची डबल नोंद

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी - शालेय विद्यार्थ्यांचे आधार लिंक करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असताना बहुतांश विद्यार्थ्यांची नावे दोन-दोन शाळेत सापडले आहेत. सरळ प्रणालीत नोंदवलेले विद्यार्थ्याचे आधारवरील माहिती व शाळेतील पटावरील नोंदी यांच्यात तफावत आढळून आली आहे. परिणामी खासगी संस्था व अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची धाबे दणाणले आहेत. परिणामी, तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सुचना शाळांना केल्या आहेत.

प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थ्याची पुर्ण माहिती शासनाकडे असावी यासाठी त्या विद्यार्थ्याचे आधार लिंक करण्याचा उपक्रम शासनाने ठरवला. त्यानुसार शाळामार्फत २०१४-१५ पासून ही कार्यवाही करण्यात आली. याअंर्तगत शालेय विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांचे आधार लिंक करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी सरल प्रणालीमध्ये अद्यावत करण्यात येत आहे. हे काम सुरू असतानाच विद्यार्थ्यांची दोन ठिकाणी नावे असल्याचे आढळून आले आहे. तसेच सरल प्रणालीमध्ये नोंदी यांच्यामध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे. म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद व खाजगी संस्थांच्या शाळांमध्ये ही नावे असल्याचे शिक्षण आयुक्तांच्या बैठकीत उघडकीस आले. त्यावर तातडीने अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांना तपासणी करण्याच्या सुचना केल्या आहेत.

हेही वाचा: पिंपळे निलख येथे अचानक झाड कोसळले, प्रसंगावधान राखल्याने अपघात टळला

या संदर्भात गट साधन केंद्र व शहर साधन प्रमुखांकडून खुलासा मागविण्यात आलेला आहे. दरम्यान गावात असताना एक आधार आणि उसतोडीसाठी किंवा अन्य कामासाठी बाहेरगावी गेल्यावर त्याठिकाणीही आधारची नोंदणी करण्यात आली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान पटसंख्या वाढवून खासगी संस्थांच्या शाळा व शिक्षकांची संख्या टिकविण्यासाठीच हा डबलगेम करण्यात आला असावा, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

अडथळ्यांची शर्यत

सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती शासनाकडे असावी यासाठी प्राथमिक शाळेतील सर्वच विद्यार्थ्याना आधार लिंकशी जोडण्यात येण्यासाठी १०० टक्के उद्दीष्ट गाठण्याचे निर्देश दिले होते. मात्र, स्थलांतरीत विद्यार्थ्यांची समस्या, आधार कार्ड काढण्यासाठी लागणाऱ्या इतर पुराव्यांचा अभाव यामुळे १०० टक्के उद्दीष्ट गाठणे कठिण बनले. यामध्ये नवीन पहिलीत दाखल होणारी नवीन पटसंख्या १०० टक्के उद्दीष्टात खो घालणारी महत्वाची समस्या ठरत होती.

loading image
go to top