esakal | पिंपळे निलख येथे अचानक झाड कोसळले, प्रसंगावधान राखल्याने अपघात टळला | Tree Colapse
sakal

बोलून बातमी शोधा

Tree Colapse

पिंपळे निलख येथे अचानक झाड कोसळले, प्रसंगावधान राखल्याने अपघात टळला

sakal_logo
By
रमेश मोरे

पिंपळे निलख - येथील रहदारीच्या नंदन सोसायटी चौकात अचानक मोठे झाड कोसळले‌. सोमवार ता. ११ सायंकाळी ७ च्या दरम्यान ही घटना घडली. सायंकाळची वेळ असल्याने या रस्त्यावर वाहनांसह फेरफटका मारणा-यांची मोठी संख्या असते. अचानक करकर आवाज आल्याने झाड्याच्या भोवती रस्त्यावरून चालणा-या नागरिकांना येथील प्रमोद नितनवरे, सुदेश साठे, अतुल चौधरी यांनी तात्काळ मागे ओढले. यामुळे मोठा अनर्थ टळला. अचानक झाड कोसळल्याने फांद्यांमुळे एक सायकल स्वार व दोन वाहनांना किरकोळ खरचटले.

हेही वाचा: पिंपरी : शहरात मंगळवारी, बुधवारी आणि गुरुवारी कोविड लसीकरण

घटनेची माहीती मिळताच परिसरातील नगरसेवक संदिप कस्पटे, तुषार कामठे, संदिप धुरी, राजेंद्र गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिरिष साठे यांनी तत्काळ महापालिका अग्निशाभक दलास कळवून घटनास्थळी भेट दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाने तात्काळ हे झाड हटविण्यात आल्याचे शिरिष साठे यांनी सांगितले.

loading image
go to top