Dr Raghunath Mashelkar : डॉ. पी. डी. पाटील यांनी ओळखले नव्या भारताचे समीकरण

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गौरव समारंभात डॉ. रघुनाथ माशेलकर बोलत होते.
Dr Raghunath Mashelkar
Dr Raghunath Mashelkarsakal
Summary

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गौरव समारंभात डॉ. रघुनाथ माशेलकर बोलत होते.

पिंपरी - ‘देशाच्‍या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सध्या सुरू आहे. पण, भारत हा ७० टक्के खेड्यात आणि १७ टक्के झोपडपट्ट्यांत राहतो. त्यालाही सर्वगुणसंपन्न करणे गरजेचे आहे. आगामी काळात शिक्षण व भवितव्य हेच नव्या भारताचे समीकरण महत्त्वाचे असेल. ते डॉ. पी. डी. पाटील यांच्यासारख्या व्यक्तीने ओळखले आहे, त्याच विचारांतून त्यांनी आपल्या शिक्षणसंस्थांची उभारणी केली आहे,’ असे गौरवोद्‍गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काढले.

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गौरव समारंभात डॉ. माशेलकर बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे अध्यक्षस्थानी होते. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वेदप्रकाश मिश्रा, अमेरिकेतील ज्येष्ठ वैद्यकीय शास्त्रज्ञ डॉ. मकरंद जावडेकर, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, विश्वस्त डॉ. यशराज पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘शिक्षणाचा वेध पी. डी. पाटील यांनी घेतला आहे. ज्ञान, बुद्धी, व्यक्ती, क्षमता, मूल्यसंवर्धन या शिक्षणाच्या अंगांचा सुरेख मेळ घातला आहे. हजारो डॉक्टर ‘डीपीयू’तून घडत आहेत. रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.’’

शिंदे म्हणाले, ‘‘डॉ. पी. डी. पाटील यांच्या जीवनप्रवासाचा मी साक्षीदार आहे. श्रीमंत खूप जण असतात. पण, दानतवृत्ती फार कमी लोकांकडे असते. त्यात पी. डी. पाटील आहेत. उत्तम आणि दर्जेदार शिक्षण हे मूल्य त्यांनी आजवर सांभाळले. त्यांच्या कार्याची नोंद इतिहासात केली जाईल.’’

डॉ. मोरे म्हणाले, ‘‘ऐंशीच्या दशकात वसंतदादा पाटील यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी विनाअनुदानित शिक्षणसंस्थांना मान्यता देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. या दूरदृष्टी डॉ. पी. डी. पाटील यांना समजली आणि शिक्षणसंस्थेचे बीज लावले. शिक्षणाचा गुणात्मक विकास करण्याचा ध्यास घेतला.’ डॉ. सोमनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. स्मिता जाधव यांनी आभार मानले.

‘संस्थेतील कर्मचाऱ्यांची मोलाची साथ’

‘पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. त्यामुळेच मी इथवर वाटचाल करू शकलो. संस्था म्हणजे चार भिंतींची इमारत नसते. तिथे सौंदर्यदृष्टी आणि उपयोगिता याचा मिलाफ असावा लागतो. मी आत्मस्तुती करतो, पण माझ्याकडे ती दृष्टी होती. १९९६ मध्ये मेडिकल कॉलेज सुरू केले. शिक्षणाच्या दर्जावर जाणीवपूर्वक भर दिला. आमचे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल राज्यात पहिल्या क्रमांकाचे धर्मादाय रुग्णालय आहे. या वाटचालीत विद्यापीठातील व संलग्न संस्थांमधील कुलगुरू, प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची मोलाची साथ मिळाली. त्यांची साथ नसती तर हे शक्य नव्हते. पिंपरी-चिंचवड आता देशाच्या नकाशावर शैक्षणिक हब म्हणून ठळक आले आहे. मला त्यासाठी योगदान देता आले हे मी माझे भाग्य समजतो,’ अशी भावना डॉ. पी.डी.पाटील यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com