Pimpri Elections: अंतिम प्रभागरचनेकडे इच्छुकांचे लक्ष; हरकतींवरील सुनावणी पूर्ण, लवकरच विभागाकडे सादर
Municipal Elections: महापालिका निवडणुकीसाठी पिंपरीतील प्रभागरचना अंतिम करण्याच्या प्रक्रियेत अंतिम हरकती व सूचनांवर सुनावणी पूर्ण झाली आहे. इच्छुक उमेदवार आता अंतिम प्रभागरचनेकडे लक्ष ठेवत आहेत.
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवरील हरकती व सूचनांवर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली. आजअखेर (ता. १५) प्रभागरचना अंतिम करून ती २२ सप्टेंबरपर्यंत नगरविकास विभागाला सादर केली जाणार आहे.