Government Staff Absence : दिवाळीनंतरही सरकारी कार्यालयांत शुकशुकाट; कामासाठी आलेल्या नागरिकांना ‘सोमवारी या’ सांगून परत पाठवले

Government Offices in Pimpri Chinchwad Continue Holiday Mood After Diwali : दिवाळीची सुट्टी संपल्यानंतरही पीएमआरडीए, तहसील कार्यालय आणि निगडीतील अन्नपुरवठा विभागात अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी दिसली. कामासाठी आलेल्या नागरिकांना ‘सोमवारी या’ असे सांगण्यात आल्याने त्यांची निराशा झाली
Pimpri-Chinchwad Municipal Corporation Holiday Mood After Diwali

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Holiday Mood After Diwali

sakal
Updated on: 

पिंपरी : दिवाळीची सुट्टी संपून शासकीय कार्यालये सुरू झाली तरी अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ‘हॉलिडे मूड’ कायम असल्याचे चित्र दिसले. कुठे विभागप्रमुखांच्या खुर्च्या रिकाम्या, तर कुठे कामकाजाची जबाबदारी मोजक्याच कर्मचाऱ्यांवर होती. विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची ‘सोमवारी या,’ असे सांगून बोळवण करण्यात आली. त्यामुळे सुट्टीनंतर कामे मार्गी लागण्याच्या अपेक्षेने आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

Loading content, please wait...