esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : हातगाडी, टपरीधारकांचे महापालिकेवर धडक मोर्चा

पिंपरी : हातगाडी, टपरीधारकांचे महापालिकेवर धडक मोर्चा

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फेरीवाले, टपरीधारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईच्या निषेधार्थ नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे महापालिकेवर शुक्रवारी (ता.१) धडक मोर्चा काढला. ‘नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत शहरातील फेरीवाल्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.

हेही वाचा: सातारा : निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर झाली पोच

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, महिला विभागाच्या वृषाली पाटणे, वहिदा शेख, सुनंदा चिखले, शमा सय्यद, नंदा तेलगोटे, सुरेश देडे, किरण साडेकर, यासीन शेख, अमृत माने, कासीम तांबोळी, सखाराम केदार, तुकाराम माने, सलीम डांगे, संभाजी वाघमारे, सय्यद अली आदींसह शहरातील विक्रेत्यांनी सहभाग घेतला. ‘आम्हाला रोजीरोटी द्या,’ ‘सणासुदित व्यवसाय हिरावून नका, कायदा अमलात आणा,’’ अशा घोषणा फेरीवाल्यांनी दिल्या.

यावेळी नखाते म्हणाले, ‘‘ देशाच्या संसदेने सन २०१४ मध्ये ‘पथ विक्रेता अधिनियम’हा कायदा केला आहे. राज्य शासनानेही महापालिकेला आदेश दिले आहेत. मात्र, महापालिका फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई करत आहे. विक्रेत्यांचा रोजगार हिरावून घेऊन त्यांना बेरोजगार केले जात आहे.

दरम्यान, आंदोलनानंतर शिष्टमंडळाने सहायक आयुक्त प्रशांत जोशी व प्रशासन अधिकारी मुकेश कोळप यांची भेट घेतली. शहरातील विविध भागातून आलेल्या विक्रेत्यांनी आपापल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. एकतर्फी कारवाई थांबवून कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर त्यांनी पुढील आठवड्यामध्ये आयुक्तांबरोबर बैठक घेऊ, असे आश्वासन दिले.

loading image
go to top