esakal | पिंपरी : कौशल्यक्षम शिक्षणाकडे मुलींची पाठ !
sakal

बोलून बातमी शोधा

ITI

पिंपरी : कौशल्यक्षम शिक्षणाकडे मुलींची पाठ !

sakal_logo
By
आशा साळवी - सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मुलींना कौशल्यक्षम शिक्षण मिळावे, या उद्देशाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (ITI) विविध योजना आखल्या आहेत. त्यानुसार मुलींची प्रवेशसंख्या वाढली. मात्र, मागील दोन वर्षांपासून मुलींचा ओघ घटत आहे. दरवर्षी सरासरी एक हजार विद्यार्थिनींनी आयटीआय प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते.

व्यवसाय प्रशिक्षण आणि शिक्षण संचालनालयाकडून (डीव्हीईटी) राज्यातील सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये मुलींसाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या ३० टक्के जागा आरक्षित आहे. शहरातील शासकीय आणि खासगी आयटीआय मिळून जवळपास दीड हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आयटीआयमध्ये ११ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

हेही वाचा: तुम्ही एमबीए करणार आहात? तर अशी करा 'एमबीए सीईटी'ची तयारी

आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक सक्षम होण्यासाठी त्यांना कौशल्यक्षम अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे. विशेष अभ्यासक्रमांबरोबरच मुलांचे वर्चस्व असलेल्या अभ्यासक्रमामध्ये मुलींना प्रवेश दिला जात आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून आयटीआयच्या अभ्यासक्रमांकडील मुलींचा ओढा कमी होताना दिसत आहेत.

२०१९मध्ये आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांना १७४ मुलींनी प्रवेश घेतला होता. मात्र, २०१९ मध्ये प्रवेश क्षमतेच्या तुलनेत ९२७ इतकी कमी झाली, तर २०२१मध्ये अवघ्या १५७ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला. म्हणजेच दरवर्षी सरासरी एक हजार विद्यार्थिनींनी प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून कळते.

यांनाही मिळेना पसंती

ड्रेस मेकिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर, कॉस्मेटोलॉजी, फॅशन टेक्नोलॉजी, सिविंग टेक्नोलॉजी, स्टेनोग्राफी आणि सेक्रेटरिअल असिस्टंट यासारख्या महिलाप्रधान अभ्यासक्रमांकडेही नापसंती दाखवली आहे. २०१९मध्ये महिलाप्रधान अभ्यासक्रमांना १६ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतले होते, तर २०२०च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ४० विद्यार्थिनींनीच प्रवेश घेतले आहेत.

यंदा अंदाज चुकला

अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर झाल्याने निकालात वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत आयटीआयच्या अभ्यासक्रमांकडे असलेला ओढा पाहता, यंदा प्रवेशांमध्ये वाढ होण्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात तसे घडलेले नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

हेही वाचा: मुंबई : पोलीसांनी वृद्धेला साडी, चोळी देऊन केले मुलांच्या हवाली

‘‘औद्योगिक क्षेत्रांमध्ये वूमन एम्पॉवरमेंटबाबत मागणी आहे. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी तांत्रिक क्षेत्राकडे यावे जेणेकरून त्यांना रोजगाराची तसेच, स्वयंरोजगाराची संधी प्राप्त होईल.’’

- शशिकांत पाटील, प्राचार्य, आयटीआय कासारवाडी-मोरवाडी

‘‘मागील काही वर्षांपासून आयटीआयच्या अभ्यासक्रमांकडील मुलींचा ओढा कमी होताना दिसत आहे. दरवर्षी विद्यार्थिनी आयटीआय प्रवेशाकडे पाठ फिरवत असल्याने आरक्षित जागा रिक्त राहत आहेत.’’

- बसवराज विभूते, प्राचार्य, खासगी आयटीआय, निगडी

‘‘टाटा मोटर्स तसेच, महिंद्रा कंपनीमध्ये केवळ महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यांनी तांत्रिक कौशल्य क्षेत्राकडे यावे. मुलींना या क्षेत्रात प्राधान्य आहे. त्यांनी प्रवेशाची संधी घेणे आवश्‍यक आहे.’’

- कमलेश पवार, गटनिदेशक, शासकीय आयटीआय

आकडे बोलतात

२०१९ प्रवेश स्थिती

आयटीआय...क्षमता...प्रवेश

  • शासकीय आयटीआय, निगडी...५४५...३६

  • मुलींची आयटीआय, कासारवाडी...११६...१०८

  • मोरवाडी आयटीआय...३००...१६

  • खासगी आयटीआय, निगडी...८०...३

२०२० प्रवेश स्थिती

आयटीआय...क्षमता...प्रवेश

  • शासकीय आयटीआय, निगडी...५७२...२८

  • मुलींची आयटीआय, कासारवाडी...१४०...१३१

  • मोरवाडी आयटीआय...३००...२५

  • खासगी आयटीआय, निगडी...८०...३

loading image
go to top