

Consumers Complain About Overpricing Despite GST Cut
sakal
पिंपरी : सरकारने वस्तू व सेवा करात (जीएसटी) कपात केल्याने औषधांच्या किमती कमी झाल्या आहेत. यानंतरही काही विक्रेते पूर्वीच्याच दराने औषधांची विक्री करत आहेत. यातून लूट होत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.केंद्र सरकार आणि जीएसटी परिषदेने औषधे आणि वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी १२ वरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय २२ सप्टेंबरला घेतला. यानुसार प्रामुख्याने कर्करोगावरील उपचाराची तसेच इतर ३३ जीवनावश्यक औषधे करमुक्त करण्यात आली.