

Traffic Chaos at Morwadi Chowk After Block Installation
sakal
सोमवारी सकाळी चौकातील चारही बाजूंना वाहनांच्या एक ते दीड किलोमीटर रांगा लागल्या होत्या. रस्ता ओलांडताना वाहनचालकांच्या संयमाचा अंत होत आहे. शहरी पथ धोरणांतर्गत विकसित केलेले पदपथ आणि मेट्रो स्थानकांमुळे मुंबई-पुणे महामार्गावरील चिंचवड ते पिंपरी रस्ता अगोदरच अरुंद झाला आहे. त्यात मोरवाडी चौकात वाहतूक बेटाचा घाट घालत महापालिकेने ब्लॉक आणि पीव्हीसी स्प्रिंग रोल लावले आहेत. परिणामी अडथळे येऊन कोंडी वाढली आहे. या चौकातील चारही दिशांना रिक्षा लावलेल्या असतात. त्यामुळे कोंडी वाढते.