

Pimpri Stamp Duty Fraud Case
Sakal
पिंपरी : मुंढव्यातील जमीन व्यवहारात सहा कोटींचे मुद्रांक शुल्क न भरता शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.